आंबोली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी तालुक्यातील ५६१९ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ८२२ कुटुंबे व एकूण ४००४ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर सावंतवाडी ३० किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये २२३५ पुरुष आणि १७६९ स्त्रिया आहेत.
हवामान
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते.
Previous
Next
शैक्षणिक सुविधा
पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ आंबोली तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग अंतर्गत युनियन इंग्लिश स्कूल तांबोळी या शाळेची स्थापना 1961 मध्ये झाली शाळा स्थापन झाल्यापासून आजपर्यंत आमची शाळा अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे आमच्या शाळेमधून आत्तापर्यंत अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शाळेमध्ये चांगली सेवा देऊन सेवानिवृत्त झाले आहेत सध्या त्यांनी सर्व कर्मचारी अतिशय झोकून देऊन काम करीत आहेत शाळेची गुणवत्ता वाढीसाठी सर्व कर्मचाऱ्यांची कायम धडपड दिसून येते आमच्या शाळेमध्ये एनटीएस एन एम एस स्कॉलरशिप यासारख्या परीक्षेला दरवर्षी विद्यार्थी चांगले करतात इयत्ता दहावीचा निकाल बऱ्याच वर्षापासून आतापर्यंत 100% लागत आहे आमच्या शाळेमध्ये दरवर्षी खेळ निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा यासारखे विविध उपक्रम घेतले जातात व त्याचे योग्य मार्गदर्शन केले जाते आमच्या शाळेसाठी झटणारी संचालक मंडळ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक माजी विद्यार्थी हे सर्व शाळेची गुणवत्ता वाढीसाठी काही प्रयत्न करीत आहेत
वैद्यकीय सुविधा (शासकीय)
सर्वात जवळील सामूहिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, प्रसूति व बालकल्याण केंद्र व क्षयरोग उपचार केंद्र आहे. गावात एक ॲलोपॅथी रुग्णालय आहे. सर्वात जवळील पर्यायी औषधोपचार रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात एक पशुवैद्यकीय रुग्णालय आहे. सर्वात जवळील फिरता दवाखाना १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
संपर्क व दळणवळण
गावात पोस्ट ऑफिस आहे. गावाचा पिन कोड ४१६५१० आहे. गावात दूरध्वनी सेवा उपलब्ध आहे. गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र आहे. गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहेत. गावात ब्रॉडबॅंड इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही, मात्र बिनतारी इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. सर्वात जवळील ब्रॉडबॅंड इंटरनेट सुविधा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात खाजगी कूरियर उपलब्ध नाही. सर्वात जवळील खाजगी कुरियर १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात शासकीय बस सेवा उपलब्ध आहे. सर्वात जवळील खाजगी बस सेवा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील रेल्वे स्थानक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात ऑटोरिक्षा, टॅक्सी व व्हॅन उपलब्ध आहेत. राष्ट्रीय महामार्ग गावाला जोडलेला आहे. राज्य महामार्ग गावाला जोडलेला आहे. जिल्यातील मुख्य रस्ता गावाला जोडलेला नाही. सर्वात जवळील जिल्यातील मुख्य रस्ता १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. जिल्ह्यातील दुय्यम रस्ता गावाला जोडलेला आहे.
पर्यटन
हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी या प्रसिद्ध शहरापासून ३० कि.मी. अंतरावर आहे. हे एक थंड हवेचे ठिकाण आहे. सह्याद्रीच्या कुशीतच समुद्रसपाटीपासून सुमारे ६९० मीटर उंचीवर असलेले हे स्थान निसर्गरम्यता आणि चांगले हवामान यासाठी प्रसिद्ध आहे. सभोवताली पसरलेले दाट जंगल, डोंगरदऱ्या, अप्रतिम सृष्टिसौंदर्य हे या स्थानाचे वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्र राज्याचे चेरापुंजी म्हणून या ठिकाणाला ओळखतात.
आंबोलीच्या नजीकच्या परिसरात सावंतवाडीच्या राजांचा राजवाडा व देवीचे मंदिर आहे. येथील हिरण्यकेशी नदी मंदिरातून हिरण्यकेशी नदीचा उगम होतो. नदीवर १० कि.मी. अंतरावर नागरतास धबधबा आहे. महादेवगड, मनोहरगड आदि जुने किल्लेही नजीकच्या अंतरावर आहेत.
आंबोलीचे जंगल दाट असल्याने सभोवतालच्या परिसरात अनेकदा रानडुकरे, ससे, गवे, बिबटे, चितळ आदी वन्य प्राणी आढळतात. सहसा न दिसणाऱ्या पक्ष्यांचेही येथे दर्शन होते.